Ad will apear here
Next
नामाचा महिमा
समाधीचा पाया म्हणजे ध्यान (Meditation) हा आहे. ध्यानाचं अंतिम टोक हे समाधी असलं, तरीही मुळात ध्यानामागची कारणमीमांसा अतिशय व्यावहारिक आहे, ती म्हणजे स्वतःला एकटं पाडणं, काही क्षण एकटं राहणं. जन्माला आल्यापासून एक तर हे जग आपल्याला एकटं राहू देत नाही किंवा आपणच धो धो करत गर्दीत मिसळायला बघतो. 

गर्दीची, लोकसंग्रहाची आवड हा खरं म्हणजे मायेचा पगडा आहे. माया म्हणजे something which is unreal. मायेची गंमत म्हणजे ती तार्किक प्रत्यक्षार्थवादाच्या प्रामाण्यावर सिद्ध होऊनही सत्यापासून लांब असते. सत्य म्हणजे एकच आहे, ते असे, की ‘आपण खरोखरच एकटे आहोत’ आणि मायाबाई ते सत्य हाणून पाडतात आणि आसपास गोतावळ्यांचा कोलाहल सुरू करतात आणि कालांतराने तेच सत्य वाटू लागतं....

आदिम आणि सनातन एकांतवास किंवा एकटेपणाची तीव्र जाणीव ध्यानात होते... वेळ लागतो; पण कधी तरी होतेच. त्याशिवाय तुम्हाला समाधी अवस्थेपर्यंत जाता येत नाही. जेवढा गोतावळा अधिक तेवढे तुम्ही मायेत गुरफटून जाता. म्हणूनच ब्रह्मचैतन्य श्रीगोंदवलेकर महाराजांनी ‘नामस्मरण करा’ असा संदेश सर्वांना दिला. त्रयोदशाक्षरी राममंत्राचा जप करत राहावा. नामावर अनुसंधान ठेवलं तर तेही एक ध्यानच आहे. नामच तुमचं बोट अलगदपणे धरून मोक्षवाटेवर चालायला शिकवते हा माझा अनुभव आहे.

- सचिन मधुकर परांजपे (पालघर)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GUIZCW
Similar Posts
गरुडकवच एकंदरीत आयुष्यातील निरुत्साह हा अनेकांना खूप त्रासदायक वाटत असतो. अनेकांच्या कार्यालयात निरुत्साही, निगेटिव्ह वातावरण असते. अनेकांना नैराश्याचा (डिप्रेशन) त्रास होतो. त्यातून मधुमेह, ब्लड प्रेशरचा त्रास उद्भवतो. काहींना नेत्रविकार असतात अशांसाठी आणि ज्यांना कालसर्प योग आहे (पण आत्ता लगेचच शांती करणं
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग सात आजच्या भागात आपण श्रीसूक्तातील ऋचा क्रमांक आठ आणि नऊ अभ्यासणार आहोत. या ऋचा पुढीलप्रमाणे आहेत.
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग एक विघ्नहर्ता श्रीगणेश, कुलदैवत श्री लक्ष्मीनारायण/महाकाली आणि सद्गुरूंच्या कृपेने श्रीसूक्त लेखमालेचा आरंभ करतो आहे. श्रीसूक्तावर विवेचन करणं हे माझ्यासारख्या अल्पमती, अल्पबुद्धी आणि सर्वसामान्य व्यावसायिक लेखकाच्या दृष्टीने शिवधनुष्य उचलण्यापेक्षाही दिव्य काम आहे याची पूर्ण जाणीव ठेवून, शक्य तितकं स्वत:च्या
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग चार आजच्या लेखात आपण श्रीसूक्तामधील ऋचा क्रमांक दोन आणि तीनचा विचार करणार आहोत. या दोन्ही ऋचा श्रीसूक्तामधील अतिशय महत्त्वाच्या ऋचा मानल्या जातात. श्रीलक्ष्मीच्या अतिशय प्रभावी अशा स्तोत्रांपैकी श्रीसूक्त हे प्रमुख असल्याने ते तर्कशुद्ध, सुस्पष्ट आहे. त्या सूक्तामधील प्रार्थनेचं तंत्रही असंच मोकळं आणि मनस्वी आहे, हे आपल्या लक्षात येईल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language